एनडीएचे शक्तीप्रदर्शन   

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांच्या कौतुकाचा ठराव भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए)  बैठकीत रविवारी एकमताने स्वीकारण्यात आाला. या निमित्ताने आघाडीने शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक काल झाली.  या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, १९ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. 
 
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पक्षांनी विश्वास प्रकट केला. दरम्यान, सशस्त्र दलांच्या का्रैतुकाचा ठराव शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांंडला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सैन्य दलांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मोठा तडाखा देणे शक्य झाले. 
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षात समन्वय असावा, या दृष्टिकोनातून सरकारने बैठक घेतली होती. या वेळी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली. 

Related Articles